मुंबई

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचे जीव वाचले

रेल्वेचे कर्मचारी अत्यंत कठीण अवस्थेतही शांतपणे काम करतात. प्रवाशांचे जीव वाचण्याचा प्रयत्न करत असतात.

नवशक्ती Web Desk

मुंबई : कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ एका वृद्धाने आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर उडी घेतली. मात्र, प्रसंगावधान राखून मोटरमनने लोकल थांबवून त्याचे प्राण वाचवले. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

चर्चगेटहून बोरीवलीकडे ही लोकल निघाली होती. तेव्हा रेल्वे रुळात एक वृद्ध आत्महत्या करत असल्याचे मोटरमनला दिसला. त्यांनी तात्काळ ब्रेक लावत लोकल थांबवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर, त्याच ट्रेनमधील प्रवासी असलेला दुसरा मोटरमन सहप्रवाशांच्या मदतीने पीडित व्यक्तीला मदत करण्यासाठी घटनास्थळी धावला. ते येईपर्यंत वृद्ध व्यक्ती रुळावरून दूर गेली आणि दुर्घटना टळली. त्या वृद्धाच्या सुरक्षिततेची खात्री केल्यानंतर आणि ट्रेन मॅनेजरकडून मंजुरी मिळाल्यानंतर मोटरमनने साधारण दोन मिनिटांनंतर ट्रेन पुन्हा सुरू केली.या वृद्धाचा शोध सध्या अधिकारी घेत आहेत. रेल्वेचे कर्मचारी अत्यंत कठीण अवस्थेतही शांतपणे काम करतात. प्रवाशांचे जीव वाचण्याचा प्रयत्न करत असतात.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री