मुंबई

J J Hospital : जे.जे. रुग्णालयात चालता चालता सापडला तब्बल १३० वर्ष जुना भुयारी मार्ग!

जे. जे. रुग्णालयात (J J Hospital) तब्बल १३० वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीच्या आवारात सापडलेला हा भुयारी मार्ग २०० मीटरचा असून तो प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे.

प्रतिनिधी

मुंबईतील भायखळा येथील जे. जे. रुग्णालय (J J Hospital) हे मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या डी.एम.पेटीट या इमारतीखाली भुयारी मार्ग सापडला आहे. ही इमारत १८९२ साली बांधण्यात आली होती. त्यामुळे हा भुयारी मार्ग १३० वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाने या भुयारी मार्गाची जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली असून पुरातत्व विभागाकडूनही या भुयारी मार्गाची पहाणी होणार आहे.

जे. जे. रुग्णालयात तब्बल १३० वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीच्या आवारात सापडलेला हा भुयारी मार्ग २०० मीटरचा असून तो प्रसूती विभाग ते लहान मुलांच्या विभागापर्यंत आहे. रुग्णालयाची तपासणी करत असताना डॉ.अरुण राठोड यांना हा भुयारी मार्ग आढळला. त्यानंतर त्यांनी या सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने भुयारी मार्गाची पूर्ण तपासणी केली.

जे. जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी यावेळी सांगितले की, सुरुवातीला या इमारतीमध्ये महिला आणि मुलांवर उपचार करणासाठी वैद्यकीय वॉर्ड म्हणून वापरली जात. आता त्याचे नर्सिंग कॉलेजमध्ये रूपांतर झालेले आहे. इमारतीच्या परिसरात भुयारी मार्ग असल्याची आम्हाला कल्पना होती. परंतु, तो नक्की कुठे आहे हे आम्हाला माहिती नव्हते. आता या भुयाराचे एक बाजू सापडली असून दुसरा मार्ग कोणत्या बाजूस उघडतो, त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहिती दिली आहे.

औद्योगिक जमिनींसाठी GST सारखी स्वतंत्र परिषद हवी; नियमात सुसूत्रता आणण्यासाठी 'सीआयआय'ची शिफारस

जम्मू-काश्मीर बस अपघात: उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तर कोरियाकडून समुद्राच्या दिशेने क्षेपणास्त्रांची चाचणी; आशियाई देशांमध्ये तणाव

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

परतवाडा प्रकरणात होणार मोठा पर्दाफाश? आरोपींच्या ५ पैकी ३ मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश