मुंबई

नोकरीची ऑफर देत बेरोजगार तरुणाची ऑनलाईन फसवणूक

सायबर ठगाने त्याला नोकरीची ऑफर दिली होती

नवशक्ती Web Desk

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणाला नोकरीची ऑफर देऊन ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. पेड टास्कसाठी सुमारे पावणेदहा लाख रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्याची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केली आहे. याप्रकरणी या तरुणाच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेल पोलीस करत आहेत. अंधेरी येथे राहणाऱ्या हा तरुणाने अलीकडेच बीएमएमचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण पूर्ण झाल्याने तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. ११ ऑक्टोबरला तो त्याच्या घरी असताना त्याला एक मॅसेज आला होता. एका खासगी कंपनीसाठी यूट्यूब व्हिडीओ लाईक केल्यास त्याला दिवसाला एक ते अडीच हजार रुपयांचे कमिशन मिळेल, अशी बतावणी करून या सायबर ठगाने त्याला नोकरीची ऑफर दिली होती.

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका

कांदळवनांची जमीन वन विभागाच्या ताब्यात द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश