मुंबई

मध्य रेल्वेच्या १५५ ठिकाणी श्रमदानाचे आयोजन

या उपक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी सहभाग घेत स्वच्छता हीच सेवा अभिमानाचे महत्व पटवून दिले

नवशक्ती Web Desk

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्य रेल्वेच्या १५५ ठिकाणी स्वच्छता हीच सेवा अभियाना अंतर्गत श्रमदान उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी सहभाग घेत स्वच्छता हीच सेवा अभिमानाचे महत्व पटवून दिले. यावेळी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रमदान उपक्रमात सहभाग नोंदवला.
लालवानी यांनी प्लॅटफॉर्म १८ जवळील पीडीमेलो रोड प्रवेशद्वारावरील परिभ्रमण क्षेत्र, उद्यान परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत वैयक्तिकरित्या साफसफाईची कामे करून उदाहरण घालून दिले. ए के श्रीवास्तव, अपर महाव्यवस्थापक आणि प्रमुख सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, विवेक कुमार गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण), मध्य रेल्वे, विभागांचे प्रधान प्रमुख, मुख्यालय आणि शाखेतील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासह या मोहिमेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला आणि महाव्यवस्थापकांसह श्रमदान केले.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजप कार्यालय जाळलं, ४ जणांचा मृत्यू, कर्फ्यू लागू

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार