ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक; VJTI चा अहवाल; BMC नवीन पूल बांधणार, २० कोटींचा खर्च PTI
मुंबई

ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक; VJTI चा अहवाल; BMC नवीन पूल बांधणार, २० कोटींचा खर्च

ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे, असा अहवाल ‘व्हीजेटीआय’ने दिला आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २० कोटी ५ लाख १८ हजार रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : ओशिवरा नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे, असा अहवाल ‘व्हीजेटीआय’ने दिला आहे. त्यामुळे जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २० कोटी ५ लाख १८ हजार रुपये खर्च करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (पूल) या विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी पश्चिम उपनगरांत सल्लागार म्हणून मे. एससीजी कन्सल्टिंग सर्व्हिसेस यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘मे. एससीजी कन्सल्टिंग सर्व्हिसेस’ यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेस दिलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात वाहतूक पुलाचा स्लॅब हा धोकादायक असल्यामुळे वाहतूक पुलाचा स्लॅब तोडून पुनर्बांधणी करणे तसेच पुलाचे बिअरिंग बदलणे आवश्यक असल्याचे सुचविण्यात आले.

त्यानंतर हा पूल पश्चिम उपनगरात लिंक रोडला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक पूल असल्याने व पुलाची धोकादायक स्थिती पाहता पुनश्चः स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेच्या पूल विभागाने घेतला. यासाठी प्रतिष्ठित संस्था ‘व्हीजेटीआय’ यांची नेमणूक करण्यात आली. ‘व्हीजेटीआय’च्या पुनःपरीक्षण अहवालानुसार सदर पुलाच्या सुपरस्ट्रक्चरचे पाडकाम करून पुनर्बांधणी व सबस्ट्रक्चरची मोठी संरचनात्मक दुरुस्ती करावी लागेल, असे प्रस्तावित करण्यात आले. त्यानुसार आता जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना; दोन नवीन झोनची निर्मिती, पाच प्रादेशिक विभाग, १५ झोन, चार नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी

पोहणेही झाले आता महाग! BMC च्या जलतरण तलावाच्या शुल्कात वाढ; सभासदांना आता ५ टक्के अधिक मोजावे लागणार

रुपाली चाकणकरांची SITकडून ६ तास चौकशी; भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

Mumbai : मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती समजणार; अपघात टाळण्यास होणार मदत

सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी, राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण