मुंबई

आपला गट हीच खरी शिवसेना-एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून हा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे

प्रतिनिधी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आपल्यासोबत ३५ हून अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही उर्वरित आमदार देखील गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे संख्याबळ वाढताना दिसत असून शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना आता एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

याबाबत एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून हा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यासाठी कायदेशीर लढा देण्याची तयारीदेखील सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना नेमकी कोणती हा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाणही आपल्याला मिळावे यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन