Palghar : बोईसरजवळ दुचाकीच्या अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू  
मुंबई

Palghar : बोईसरजवळ दुचाकीच्या अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

बोईसर-नवापूर रस्त्यावरील पाम टेंभी गावाजवळ उभ्या केलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसून दुचाकीवर बसलेल्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

Swapnil S

पालघर : बोईसर-नवापूर रस्त्यावरील पाम टेंभी गावाजवळ उभ्या केलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीची धडक बसून दुचाकीवर बसलेल्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.

मोहित राकेश वर्मा, रवी विजय गुप्ता आणि नयना महातो अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मोहित आणि रवी हे दोघे १२ वीमध्ये, तर नयना इयत्ता १० वीमध्ये शिकत होती. तिघेही बोईसरमधील गणेश नगर परिसरात राहत होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच गणेश नगर परिसरावर शोककळा पसरली.

तिघेही विद्यार्थी एकाच दुचाकीवरून (ट्रिपल सीट) नांदगाव-आलेवाडी समुद्र किनाऱ्यावर जात होते. पाम टेंभी गावात नवापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या भरधाव दुचाकीने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच बोईसर आणि सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पाच वर्षांत १०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार; महापौर परिषदेचे उद्घाटन

पायाभूत क्षेत्राला बूस्टर; केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद; उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार! शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला

पुण्यात भरधाव टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले; अन्य दोन जखमी, बोपदेव घाटात दुर्घटना

आपल्या राज्यघटनेला बळकट करण्याची वचनबद्धता