पालघर : वाढवण बंदराविरोधात समुद्रात जलसमाधी (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
मुंबई

पालघर : वाढवण बंदराविरोधात संताप; ग्रामस्थांचे समुद्रात जलसमाधी आंदोलन

वाढवण बंदराच्या विरोधातील जनआक्रोश आता थेट समुद्रात उतरला आहे. बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले.

Swapnil S

पालघर : वाढवण बंदराच्या विरोधातील जनआक्रोश आता थेट समुद्रात उतरला आहे. बंदर प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले.

समुद्रात मानवी साखळी तयार करत ‘वाढवण बंदर रद्द करा’ अशा जोरदार घोषणा देत शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात महिला आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग लक्षवेधी ठरला.

वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन सुरू आहेत. वाढवण बंदरामुळे स्थानिकांच्या पारंपरिक उपजीविकेवर, समुद्रावर आणि परिसराच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, शुक्रवारी वरोर येथे जनआक्रोश सभेचे आयोजन करून शासनाच्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय एकजूट दाखवण्यात आली होती. त्यानंतर रविवारपासून बंदराच्या कामासाठी दगड वाहून नेणारे ट्रक रोखण्यात आले आहेत. आता समुद्रात उतरून केलेल्या जलसमाधी आंदोलनामुळे वाढवण बंदरविरोधी संघर्षाने अधिक तीव्र वळण घेतले आहे. बंदर रद्द होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने शासनापुढील विरोधाचे आव्हान अधिक तीव्र झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय