मुंबई

पालकांचा कल इंग्रजी भाषेकडे ; मिशन अॅडमिशन अंतर्गत इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश

पालक आता इंग्रजी शाळेत मुलांचा प्रवेश व्हावा, यासाठी आग्रही असतात.

प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी मिशन अॅडमिशन राबवण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला. मिशन अॅडमिशन अंतर्गत एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे; मात्र एक लाख नवीन प्रवेशात ३२ हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतल्याने पालकांचा कल इंग्रजी भाषेकडे असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

इंग्रजी भाषा ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे पालक आता इंग्रजी शाळेत मुलांचा प्रवेश व्हावा, यासाठी आग्रही असतात. तर दुसरीकडे मराठी भाषा व मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्यावाढीवर भर देण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी १४ एप्रिलपासून मिशन अॅडमिशन मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. या मोहिमेअंतर्गत तब्बल एक लाख दोन हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे; मात्र नवीन मिशन अॅडमिशन मोहिमेत पालकांचा कल इंग्रजीकडे असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय पालिका शाळांत इंग्रजीचा अभ्यास योग्य प्रकारे होईल की नाही, अशी शंका पालकवर्गात निर्माण झाली आहे. त्यामुळे फीचे पैसे जास्त आकारले जात असले, तरी मुलाला खासगी शाळांत शिक्षणासाठी पाठवले जाते, असे पालक संघटनांचे म्हणणे आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत