मुंबई

उशिराने धावणाऱ्या एसी लोकलमुळे प्रवासी नाराज

प्रतिनिधी

एप्रिल अखेरीपासून एसी लोकलमध्ये प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मात्र एसी लोकलच्या फेऱ्या अचानक रद्द होणे, लोकल उशिराने धावणे या कारणांमुळे प्रवाशांकडून साधारण लोकल प्रवासाला पसंती दिली जात आहे. तर काही प्रवाशांनी एसी लोकलचे तिकीट काढूनही सुविधा आणि सेवा मिळत नसल्याने पुन्हा साधारण लोकलच्या तिकिटावर प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून लांब पल्ल्यांच्या गाडय़ांप्रमाणे वातानुकूलित लोकलचाही परतावा मिळावा अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. परिणामी उपनगरीय रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत घट झाली असून साधारण लोकलला सर्वाधीक पसंती देण्यहात येत आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा मार्गावर ५६ फेऱ्या आणि चर्चगेट ते विरार एसी ३२ फेऱ्या चालवल्या जातात. वाढलेला उकाडा आणि भाडे कपातीमुळे या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अनेकदा प्रवाशांना तिकीट काढूनही कधीकधी या सेवांचा लाभ घेता येत नाही. प्रवासी एसी लोकलची प्रतीक्षा करत असतानाच ती रद्द झाल्याची उदघोषणा होते किंवा काही वेळा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असल्यास ताटकळत असलेल्या प्रवाशांना अखेर सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट काढलेल्या प्रवाशांचे पैसे वाया जातात. दरम्यान, एसी लोकलच्या तिकीट दरात कपात झाली असली तरी सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलच्या दरात बरीच तफावत आहे. रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे वातानुकूलित लोकलचा प्रवास प्रवाशांना करता येत नसल्यास त्यांचे तिकीट किंवा पासाचे पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे प्रवाशाला त्याचा परतावा मिळावा किंवा त्यावर दुसरा पर्याय शोधण्याची मागणी प्रवाशांसोबत प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र