मुंबई

वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

वांद्रे रिक्लेमेशनच्या १ लाख ९८ हजार ४६६ चौरस मीटर तर वरळीतील आदर्श नगर येथील ६८ हजार ०३४ चौरस मीटर जागेचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.

Swapnil S

मुंबई : वांद्रे रिक्लेमेशनच्या १ लाख ९८ हजार ४६६ चौरस मीटर तर वरळीतील आदर्श नगर येथील ६८ हजार ०३४ चौरस मीटर जागेचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. वांद्रे रिक्लमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.

वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात आलेले भूखंड वगळून उर्वरित एकल इमारतींच्या पुनर्विकासासाठी मंजुरी न देता म्हाडा मार्फत बांधकाम आणि विकसन संस्था (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

एकत्रित पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक शासनाच्या पूर्व मान्यतेने मंजूर करण्यात येईल. चारपैकी एक चटई क्षेत्र निर्देशांक गृहसाठ्याच्या स्वरुपात मंजूर येईल. त्यामुळे म्हाडास जास्तीत जास्त गृह साठा देण्याची तयारी दाखवणार्या आणि निविदा प्रक्रियेतील आर्थिक आणि भौतिक अटींची पूर्तता करणाऱ्या निविदाकाराची पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडून नियुक्ती करण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबविताना शासन निर्णयांचे पालन करणे आवश्यक आहे.

वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील जागा १,९७,४६६ चौरस मीटर तर आदर्श नगरची (वरळी) ६८,०३४ चौरस मीटर क्षेत्र आहे.

विकासक संस्थेची जबाबदारी

या प्रकल्पांमधील मूळ गाळेधारक आणि रहिवाशांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करणे, पर्यायी जागेचे भाडे देणे, कॉर्पस फंड, सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी बांधकाम आणि विकासक संस्थेची राहणार आहे.

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

‘आत्मनिर्भर’ता हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग; ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार; पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली