मुंबई

एमपीएससी यूपीएससी अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा माजी विद्यार्थ्यांचा मानस

पेण मधील कोकण एज्युकेशन सोसायटीचे इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे.

अरविंद गुरव

पेण मधील कोकण एज्युकेशन सोसायटीचे इंजीनियरिंग कॉलेजची इमारत अनेक वर्षापासून बंद आहे. १९८३ ते २००८ पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या केईएस कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन जगभरात जाऊन उच्चपदावर नोकरी करत आहेत. याच आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यानी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येत यूपीएससी व एमपीएससी शिक्षणासह पुन्हा एकदा कॉलेज सुरू करण्यासाठी आणि पुढील पिढीला आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा समजाविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी या पुन:र्मिलनासाठी भारताच्या कानाकोपऱ्यासह जगाच्या अनेक देशांत कामानिमित्त स्थायिक झालेले या कॉलेजचे विद्यार्थी एकत्र आले. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, तुर्की, दुबई, कॅनडा, सिंगापूर यासह अनेक देशांचा समावेश आहे. यावेळी जवळपास ७०० हुन अधिक माजी विद्यार्थ्या-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमास व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाच्या भूतपूर्व कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, तत्कालीन प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे लाडके सर शरद गणपुळे, प्रा.आर.बी.महाजन, माजी विद्यार्थी आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, कॉलेजचे पहिल्या (१९८३) बॅचचे विद्यार्थी आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी राजीव शेठ, माजी विद्यार्थी आणि पेणचे उद्योजक उदय साठे, राजू पिचिका आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद गणपुळे म्हणाले की, पुन्हा नविन कॉलेज उभारल्यास पुढील कॉलेजमध्ये एमपीएससी-युपीएससीचे अभियांत्रिकी वर्ग सुरू करण्यात यावे. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तर माजी विद्यार्थी राजू पिचिका म्हणाले की, ज्या कॉलेजने आम्हाला ज्ञान आणि श्वास दिले त्या शहरात दहा हजार झाडांची लागवड करणार असून पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आधारित मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात "संविध" विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या संकल्पित सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी "आई डे केअर" गतिमंद मुलांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सदर कार्यक्रमासाठी आयोजन कमिटीने मेहनत घेतली असून कॉलेजचे माजी विद्यार्थी उदय साठे, राजू पिचिका, प्रकाश झावरे, मिलिंद बावधनकर, किरण पुजारी, कीर्ती पाटील, डॉ.अजित मराठे, माधव प्रभू, निशांत कोळगावकर, जितेंद्र गुप्ता, तुषार देसाई, मनोज भोळे, श्रीपाद फाटक, राहूल फणसाळकर, अजित दामले, आनंद देशपांडे, प्रशांत घाणेकर, रविंद्र सिंग, संदीप म्हात्रे, राजेश गुप्ते, एम्.बी.पाटील आदींनी सोशल मीडिया, मोबाईल व समाजमाध्यमांच्या द्वारे माजी विद्यार्थ्यांना संपर्क साधत संविध मेळावा कार्यक्रम यशस्वी केला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत