मुंबई

मुंबईतील परळ येथील पेट्रोल पंपाला आग; 'हे' असू शकते कारण ?

प्रतिनिधी

मुंबईतील परळ येथील पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना आज घडली. महानगर पाइपलाइनमध्ये गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आग आटोक्यात आली आहे. पेट्रोल पंपाजवळ महानगर गॅस पाइपलाइन असून त्या पाइपलाइनमधून गॅसगळती झाल्यामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, महानगर गॅसचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील काही दुकानांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. परिसरातील लोकांना घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करण्यास सांगण्यात आले. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश