मुंबई

गर्दी रोखायला प्लॅटफॉर्म तिकीट विक्री सायंकाळी बंदी ; मध्य रेल्वेचा निर्णय

रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊ शकेल

कमल मिश्रा

रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी रोखायला मध्य रेल्वेने नवीनच उपाय शोधून काढला आहे. १६ जूनपासून सायंकाळी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊ शकेल, असे रेल्वेला वाटते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण व पनवेल रेल्वे स्थानकात सायंकाळी सर्वसाधारण प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर रेल्वे स्थानकात सायंकाळी ६ ते रात्रौ १२.३०, ठाणे रेल्वे स्थानकात सायंकाळी ७ ते रात्रौ १.३० वाजता, कल्याण रेल्वे स्थानकात सायंकाळी ६ ते रात्रौ १.३० वाजता, एलटीटीवर सायंकाळी ६.३० ते रात्रौ १ वाजेपर्यंत तर पनवेल रेल्वे स्थानकात रात्रौ ११ ते २ वाजेपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट बंद राहील. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, लहान मुले सोबत असलेल्या महिलांना या नियमातून वगळले आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना ठळकपणे विविध ठिकाणी लावण्यास सांगितले आहे. या उपाययोजनेमुळे प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता येऊ शकेल. तसेच गर्दीच्या वेळेत गर्दीचे नियंत्रण उत्तम प्रकारे करता येईल. त्यामुळे अनावश्यक प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकावर होणार नाही.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले