मुंबई

खड्डे बुजवण्याची मोहीम जोरात सुरु; सहाय्यक आयुक्तांना पाच लाखांचा निधी

प्रतिनिधी

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण यावरून मुंबई महापालिकेला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, आतापर्यंत ३२ हजार खड्डे बुजवण्यात आले आहेत. प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना याआधीच ५० लाख रुपये रस्तेकामे व खड्डे बुजवण्यासाठी देण्यात आले आहेत, तर नव्याने पडणारे खड्डे बुजवण्यासाठी आता पालिकेच्या २४ सहाय्यक आयुक्तांना अतिरिक्त पाच लाखांचा निधी देण्यात आल्याचे पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कोल्डमिक्सने खड्डे भरण्यासाठी मुंबई पालिकेच्या २४ विभागांनी बाजारातून कोल्डमिक्स विकत घेण्यासाठी पाच लाखांचा निधी दिला जात आहे. यापूर्वी पालिकेने सर्वच विभागांना प्रत्येक पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्या निधीत आणखी ५० लाख रुपयांचा निधी दिला गेला आहे. पालिकेकडे तक्रार येताच ती तक्रार ४८ तासांत दूर करण्याचे आदेश प्रत्येक विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी आता पुरविण्यात येणाऱ्या पाच लाख रुपयांचा निधी वापरून बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोल्डमिक्सचा वापर खड्डे बुजविण्यासाठी केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईतील अद्याप खड्ड्यांची तक्रार दूर झालेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्यावरून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो आहे. ऐन गणेशोत्सवातही रस्त्यावरील खड्ड्यांनी मुंबईकर त्रासले होते. आता, नवरात्रोत्सव जवळ आला असताना रस्ते खड्डेमुक्त असावेत, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने पालिकेने २४ विभाग कार्यालयांना दिलेल्या अतिरिक्त पाच लाख रुपयांचा निधी खड्डे बुजवण्यासाठी वापरला जाणार आहे.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम