मुंबई

मुंबईतील रस्त्यांवर अद्याप आठशेहून अधिक खड्डे! २४ तासांत बुजवा; पालिका प्रशासनाचे सक्त निर्देश

पालिकेच्या २४ विभागांच्या यंत्रणा ॲक्शन मोडवर असून, २४ तासांत खड्डे बुजवा, असे निर्देश पालिका प्रशासनाने रस्ते विभागाला दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईत पावसाची ये-जा सुरू असून, मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुंबईभरातील रस्त्यावर सध्या आठशेहून अधिक खड्डे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खड्डे बुजविण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालिकेच्या २४ विभागांच्या यंत्रणा ॲक्शन मोडवर असून, २४ तासांत खड्डे बुजवा, असे निर्देश पालिका प्रशासनाने रस्ते विभागाला दिले आहेत.

आतापर्यंत ५ हजार १९४ खड्डे बुजविले

दरवर्षी मुंबई महापालिकेकडून रस्ते व खड्ड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र जोरदार पावसांत रस्ते खड्डेमय होत असल्याची स्थिती निर्माण होते. यंदाही मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्डे तात्काळ भरून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पालिका ॲक्शन मोडवर आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर खड्डा दिसल्यास २४ तासांत भरा असे आदेश वॉर्डनिहाय दिले आहेत. त्यासाठी पालिका आयुक्तांनी चोवीस वॉर्डातील सहाय्यक रस्ते अभियंत्यांना तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५ हजार १९४ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली. रस्त्यांमध्ये ५ हजार ३९६ खड्डे होते. ते चोवीस विभागातील यंत्रणेने तातडीने बुजविले असल्याची माहिती पालिकेने दिली. उर्वरित खड्डे तात्काळ भरावे, असे निर्देश दिले आहेत.

खड्ड्यांसाठी मोबाईल ॲप तयार केला असून, याद्वारे खड्ड्यांचे छायाचित्र काढून ते पालिकेच्या संकेतस्थळावर टाकता येते. त्याद्वारे संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडून खड्डा भरण्याचे आदेश देऊन कार्यवाही पूर्ण केली जाते. मोबाइल ॲपमध्ये अक्षांश-रेखांशची नोंद आपोआप होते. त्यामुळे केवळ छायाचित्र काढले, तरी जीपीएस व जीआयएसच्या मदतीने पालिकेला या खड्ड्यांची माहिती मिळते. छायाचित्र ॲपमध्ये टाकताना खड्ड्यांजवळ उभे राहणे आवश्यक आहे. यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर चाप बसेल, असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी