Mumbai : पवई तलाव प्रदूषणमुक्त; तलावात मलजल रोखण्यात मुंबई मनपा यशस्वी  X - @mybmc
मुंबई

Mumbai : पवई तलाव प्रदूषणमुक्त; तलावात मलजल रोखण्यात मुंबई मनपा यशस्वी

शहरातील अत्यंत महत्त्वाचा तलाव असलेला पवई तलाव आता प्रदूषणमुक्त झाला आहे. पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाला अखेर आळा बसणार आहे. तलावात येणारे मलजलाचे २० प्रवाह अडवून ते भांडुप आणि फिल्टरपाडा येथील मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे.

Swapnil S

मुंबई : शहरातील अत्यंत महत्त्वाचा तलाव असलेला पवई तलाव आता प्रदूषणमुक्त झाला आहे. पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाला अखेर आळा बसणार आहे. तलावात येणारे मलजलाचे २० प्रवाह अडवून ते भांडुप आणि फिल्टरपाडा येथील मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याचे काम महापालिकेने पूर्ण केले आहे. त्यामुळ पवई तलावात मलजल मिसळणे पूर्णपणे बंद होणार असून या कामासाठी ३०५६ मीटर लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.

पवई तलावात रोज सुमारे १८ दशलक्ष लिटर मलजल मिसळत असल्याने तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. वाढते नागरिकीकरण आणि तलावातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभागाने तलावात मलजल सोडणाऱ्या २० विसर्ग बिंदूंची पाहणी केली. यापैकी १८ विसर्ग बिंदू आदि शंकराचार्य मार्गावर, तर दोन विसर्ग बिंदू तलावाच्या उत्तरेकडील पेरूगेट परिसरात आहेत. आदि शंकराचार्य मार्गावरील १८ मलजल प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते विद्यमान मलनिस्सारण वाहिनीद्वारे गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत. पेरूगेट येथील दोन प्रवाह फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत.

२०२७ पर्यंत नवे प्रक्रिया केंद्र

पवई येथील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर दररोज ८ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. निविदेनुसार हे केंद्र डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करायचे असले तरी महापालिकेने मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून पुढील एक ते दोन महिन्यांत विशेष उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

८५ टक्के जलपर्णी हटवली!

या प्रकल्पाची सुरुवात ऑगस्ट २०२५ मध्ये झाली. अवघ्या १३ महिन्यांत २० प्रवाहांना अडवून त्यांचा प्रवाह प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. पवई तलावातील जलपर्णी हटविण्याचे कामही महापालिकेकडून सुरू आहे. दोन हार्वेस्टरच्या सहाय्याने २९ सप्टेंबरपर्यंत २० हजार ३४० मेट्रिक टन म्हणजेच ८५ टक्के जलपर्णी काढण्यात आली. तलावातील जलपर्णीचे अंदाजित प्रमाण २४ हजार मेट्रिक टन आहे. मलजलामुळे तलावाच्या पाण्यातील सेंद्रिय घटक वाढल्याने जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मलजलाचा प्रवाह थांबल्यानंतर जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

सर्वोच्च न्यायालयाचा वाहनचालकांना इशारा; थकीत दंडवसुलीची गंभीर दखल; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कठोर कारवाईचे आदेश

पिकनिकसाठी आलेल्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

मध्य रेल्वेचा कसारा येथे १२ दिवस विशेष ब्लॉक; तिसऱ्या मार्गाच्या कामामुळे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

No UPI Day : एमडीआर शुल्काला विरोध वाढला; आज 'नो युपीआय डे'? दोन प्रमुख संघटनांकडून परस्परविरोधी भूमिका