मुंबई

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करा; मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते.

Swapnil S

मुंबई : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय स्वीप समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर बोलत होते. यावेळी समितीचे प्रमुख समन्वयक तथा अपर जिल्हाधिकारी किरण महाजन, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, समितीचे समन्वयक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

क्षीरसागर म्हणाले की, प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. याबरोबरच नव मतदारांच्या नोंदणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक