मुंबई

ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळ धुळीचे प्रदूषण रोखणार

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील हवा दूषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : अचानक पडलेल्या पावसामुळे मुंबईतील प्रदूषणात घट झाली आहे; मात्र प्रदूषणात पुन्हा वाढ झाल्यास वेळीच धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाजवळ धूळ कमी करणारे यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे जोगेश्वरीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात वरुणराजाने माघार घेताच हवेतील गुणवत्ता खालावल्याचे निदर्शनास आले आहे. हवेतील गुणवत्ता खालावल्यानंतर प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे मुंबई उच्च न्यायालयाने वाढत्या प्रदूषणावरून मुंबई महापालिकेसह राज्य सरकारला फैलावर घेतले. उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर मुंबई महापालिकेने कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या विकासकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर काही ठिकाणी बांधकाम थांबवले आहे.

धूळ नियंत्रीत करणारे यंत्र कार्यान्वित

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील हवा दूषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जोगेश्वरी येथील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील ट्रॉमा केअर रुग्णालय येथील चौकात ही यंत्रणा बसवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी