मुंबई

मालमत्ता कर थकबाकी तब्बल २० हजार कोटींच्या घरात; BMC ला आर्थिक तोटा

उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल २० हजार कोटी रुपये मालमत्ता करापोटी थकित असल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल २० हजार कोटी रुपये मालमत्ता करापोटी थकित असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटाखालील घरांना कर माफी दिली आणि त्याचा फटका मुंबई महापालिकेला सहन करावा लागत आहे.

दरम्यान, थकीत रक्कम वसुलीसाठी पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. मुंबई महापालिकेने उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत जकात बंद झाल्यापासून मालमत्ता कर उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. जकात बंद झाल्यापासून जीएसटी म्हणून मुंबई महापालिकेला महिना ९०० कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत जमा होतात. तर दुसरीकडे ५०० चौरस फुटाखालील घरांना कर माफी दिल्याने मुंबई महापालिकेला वर्षाला ४६४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागते. मालमत्ता करातून मुंबई महापालिकेला वर्षाला ६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मालमत्ता कर थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

थकबाकीची कारणे

न्याय प्रविष्ट प्रकरणे कर प्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा विविध कारणांमुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढत गेल्याची माहिती कर निर्धारण व संकलन खात्याने दिली आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत