मुंबई

प्रभू येशू जन्मोत्सवासाठी जागा उपलब्ध करून द्या; हायकोर्टाचे आदेश

सालाबाद प्रमाणे १६ डिसेबरला गिरगांव चौपाटीवर प्रभू येशू जन्मत्सोव साजरा करण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या उत्सवासाठी सुमारे १५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून द्या, असे आदेश न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम सी चांडक यांच्या खंडपीठाने दिले.

Swapnil S

मुंबई : सालाबाद प्रमाणे १६ डिसेबरला गिरगांव चौपाटीवर प्रभू येशू जन्मत्सोव साजरा करण्यास उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या उत्सवासाठी सुमारे १५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून द्या, असे आदेश न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम सी चांडक यांच्या खंडपीठाने दिले.

गेली सुमारे 45 वर्षापासून प्रभू येशू जन्मत्सोव कमिटीच्यावतीने दरवर्षी गिरगाव चौपाटीवर प्रभू येशू जन्मत्सोव साजरा करण्यात येतो. या उत्सवात हजारो ख्रिश्‍चन बांधव ऐकत्र येतात. उच्च न्यायालयाने जून २०१८ मध्ये या चौपटीच्या वापरासाठी मॉनेटरींग कमिटी स्थापन केली. या कमिटीने या वर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी केवळ चार हजार चौरस मिटरची जागा मंजूर केली. ती वाढवून मिळावी म्हणून जन्मत्सोव कमिटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावेळी याचिका कर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. मिहिर देसाई, अ‍ॅड.जतीन शेठ आणि अ‍ॅड.अंकुर शहा यांनी बाजू मांडली. तसेच यापूर्वीही न्यायालयाने जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. यावर्षीचा कार्यक्रम रविवार 10 डिसेबर रोजी होणार असल्याने अंतरिम आदेश द्यावा अशी

विनंती केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी