मुंबई

Mumbai : ट्रेनच्या इंजिनातून अजगराच्या पिल्लाची सुरक्षित सुटका, Video

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मडगाव–सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनामध्ये आढळलेल्या भारतीय अजगराच्या पिल्लाची बुधवारी पहाटे सुरक्षित सुटका करण्यात आली.

Swapnil S

लासलगाव : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मडगाव–सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनामध्ये आढळलेल्या भारतीय अजगराच्या पिल्लाची बुधवारी पहाटे सुरक्षित सुटका करण्यात आली. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे आणि प्राणी कल्याण अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे रेल्वेच्या कामकाजात कोणताही अडथळा न येता ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव–सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस पहाटे १२.४५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर दाखल झाली. त्यावेळी इंजिन क्रमांक २२९३६ च्या कॅब क्रमांक २ मध्ये लोको पायलट एन. के. पारसोया यांना अजगराचे पिल्लू आढळले. त्यांनी तातडीने कार्यभार स्वीकारणारे लोको पायलट ओमप्रकाश राम तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर मानद प्राणी कल्याण अधिकारी अभिषेक अशोक ठवरे घटनास्थळी दाखल झाले.

आवश्यक खबरदारी घेत पहाटे सुमारे १.४० वाजता अजगराच्या पिल्लाची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मध्य रेल्वेने लोको पायलट व प्राणी कल्याण अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले. दरम्यान, ही घटना रेल्वेची सुरक्षितता, आपत्कालीन प्रतिसाद क्षमता व वन्यजीव संरक्षणाप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करणारी असल्याचे रेल्वेने म्हटले.

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Madhu Kambikar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

मस्कच्या मक्तेदारीला भारताने आव्हान द्यावे; नीती आयोग माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांची सूचना

­सत्तेत एकत्र, पण कारभारावरून संघर्ष! पाणीपुरवठा प्रकरणावरून सावंतवाडी नगरपरिषदेत भाजप-शिंदे सेना आमनेसामने