परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले 
मुंबई

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले

आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जाण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणाऱ्या व्यावसायिक राज कुंद्राला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हिसका दिला. दोघांना परदेशात जायचे असेल तर आधी ६० कोटी रुपये जमा करावेत. अथवा तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी द्या. त्या नंतरच याचिकेवर विचार केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट करत याचिकेची सुनावणी एक आठवडा तहकूब ठेवली.

Swapnil S

मुंबई : आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जाण्याची परवानगी द्या. अशी विनंती करणाऱ्या व्यावसायिक राज कुंद्राला उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा हिसका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर आर भोसले यांच्या खंडपीठाने दोघांना परदेशात जायचे असेल तर आधी ६० कोटी रुपये जमा करावेत. अथवा तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी द्या. त्या नंतरच याचिकेवर विचार केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट करत याचिकेची सुनावणी एक आठवडा तहकूब ठेवली.कथित ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हे आदेश दिले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलिस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्यात लूकआउट नोटीस जारी केली केली. दरम्यान, कुंद्राची याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने वडिलांना लंडनमध्ये भेटायला जाण्यासाठी परवानगी द्यावी तसेच लुकआऊट नोटीस रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.

फसवणुकीइतकीच रक्कम भरा

खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेतली. ६० कोटी रुपयांच्या फसवणूकचे प्रकरण आहे. त्यामुळे तेवढीच ६० कोटी रक्कम जमा कराआणि परेदेशी जाऊन या. यावेळी कुंद्रा च्या वकिलांनी ही रक्कम मोठी होत असल्याने भरणे शक्य नसल्याने ती कमी करावी अशी विनंती केली. रक्कम भरता येत नसेल तर तेवढ्या रक्कमेची बँक गॅरंटी देणार का ते आठवड्याभरात सांगा, असे स्पष्ट करीत याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

'मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार'; २४०० रुपयांत ‘ऑपरेशन सिंदूर’ घड्याळ, HMT वर नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

"यावेळी मी एकटी नाही"; विनेश फोगटने निवृत्ती मागे घेतली; सोशल मीडियावर केली भावूक पोस्ट

Mumbai Metro Update: कल्याण-तळोजा मेट्रोने गाठला महत्त्वाचा टप्पा; MMRDA ने दिली माहिती, कधी पूर्ण होणार प्रकल्प? जाणून घ्या

Mumbai : रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाला तृतीयपंथींकडून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संताप

Mumbai Viral Video : विक्रोळीतील पादचारी पुलावर शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप