मुंबई

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी भेट घेतली. विकासकामांबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असणार हे निश्चित आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकरदेखील उपस्थित होते. टोलचा प्रश्न, मराठी पाट्या, धारावी पुनर्विकास, राममंदिर तसेच विविध विकासकामांबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींचा सिलसिला वाढत चालला आहे. गेल्या वर्षभरात दोघांची तब्बल सहा वेळा भेट व चर्चा झाली आहे. डिसेंबर महिन्यातील ही दोघांची दुसरी भेट आहे. याआधी २ डिसेंबर रोजी राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्यावेळी टोल आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य त्या कारवाईचे आश्वासन राज यांना दिले होते.

राजकीय वर्तुळात मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या सातत्याने होत असलेल्या भेटीगाठींकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. राज ठाकरे यांनी अद्यापपर्यंत तरी कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी केलेली नाही.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त