मुंबई

राणीची बाग बुधवारी खुली; गुरुवारी मात्र बंद राहणार

मुंबई प्रशासनाने सणानिमित्त महानगरपालिका ईद-ए-मिलाद मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांत १६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुटी रद्द करून त्या ऐवजी १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर केली आहे.

Swapnil S

मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी नागरिकांसाठी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई प्रशासनाने सणानिमित्त महानगरपालिका ईद-ए-मिलाद मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांत १६ सप्टेंबर २०२४ रोजी पूर्वी घोषित केलेली सार्वजनिक सुटी रद्द करून त्या ऐवजी १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर केली आहे. महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार, बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसरया दिवशी बंद ठेवण्यात येते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी