ऐन सणासुदीत घरांच्या विक्रीवर विपरित परिणाम होणार; RBI च्या निर्णयाने गृहकर्जाचे दर वाढणार असल्याने विकासकांना भीती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

ऐन सणासुदीत घरांच्या विक्रीवर विपरित परिणाम होणार; RBI च्या निर्णयाने गृहकर्जाचे दर वाढणार असल्याने विकासकांना भीती

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, असे मत रिअल इस्टेट क्षेत्रातील संघटना क्रेडाई आणि नरेडको यांनी बुधवारी व्यक्त केले.

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात घरांच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, असे मत रिअल इस्टेट क्षेत्रातील संघटना क्रेडाई आणि नरेडको यांनी बुधवारी व्यक्त केले.

मध्यवर्ती बँकेच्या या ताज्या निर्णयामुळे गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होईल, असेही त्यांनी नमूद केले. क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर पटेल आणि नरेडकोचे अध्यक्ष प्रवीण जैन यांनी सांगितले की, आरबीआयच्या निर्णयामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढतील आणि त्याचा परिणाम घरांच्या विक्रीवर होऊ शकतो. रेपो दरातील ही वाढ जागतिक अनिश्चितता आणि महागाईबाबतच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पाहिली पाहिजे, असे पटेल म्हणाले. आरबीआयच्या या पतधोरणाचा परिणाम निधीची उपलब्धता आणि खर्चावर होईल, असेही त्यांनी सांगितले. आपण आता सणासुदीच्या काळात प्रवेश करत आहोत. तो गृहनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. कर्ज घेण्याचा खर्च वाढल्याने या कालावधीतील विक्रीवर काहीसा परिणाम होऊ शकतो. तरीही घरांची मूळ मागणी मात्र भक्कम आहे, असे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर पटेल म्हणाले. सध्या घरांची मागणी वाढली असल्याचे जैन यांनीही नमूद केले. खरेदीदारांचा सकारात्मक दृष्टिकोन, सणासुदीच्या काळातील मागणी आणि स्वतःचे घर असण्याची दीर्घकालीन गरज यांमुळे निवासी बाजारपेठेवर या दरवाढीचा परिणाम मर्यादित राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे प्रवीण जैन यांनी सांगितले.

रिअल इस्टेट क्षेत्र आपली सध्याची गती कायम राखत आपली ताकद आणि लवचिकता दर्शवत राहील, असे निरीक्षण जैन यांनी नोंदवले.

क्रेडाई आणि नरेडको या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या दोन प्रमुख संघटना आहेत आणि त्यांच्याशी एकूण २०,००० बिल्डर जोडलेले आहेत. देशात बंगळुरुपाठोपाठ महाराष्ट्रातील पुणे स्थावर मालमत्ता क्षेत्रात अव्वल आहे.

व्याजदर वाढीमुळे कर्जपुरवठ्याचा वेग मंदावणार

व्याजदरातील वाढीमुळे बँकांच्या कर्जपुरवठ्यातील वाढीचा सध्याचा १८ टक्क्यांहून अधिक असलेला वेग काहीसा मंदावू शकतो. परंतु यामुळे व्यापक आर्थिक विस्तारावर परिणाम होण्याची शक्यता नाही, असे रिझर्व्ह बँकेने बुधवारी सांगितले. मध्यवर्ती बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर आणि भविष्यात अशाच प्रकारची पावले उचलले जाण्याचे संकेत दिल्यानंतर पत्रकारांना डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन जे. म्हणाले की, व्याजदरातील वाढीचा परिणाम प्रत्यक्ष कर्जदारांच्या कर्जाच्या व्याजावर होण्यासाठी सामान्यतः दोन तिमाहीचा काळ लागतो. व्यावसायिक बँकेतून मध्यवर्ती बँकेचे अधिकारी बनलेले स्वामिनाथन म्हणाले, मागणी आणि व्याजदरातील वाढ या दोन्हीमुळे काही प्रमाणात वाढ मंदावेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

फडणवीसांच्या भेटीची कंत्राटदारांची मागणी; ८६ हजार कोटींची बिले थकीत

२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र; 'आम्ही हे करून दाखवू' - मोदींनी दिला नवा नारा

शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीची नामुष्की; चाऱ्याअभावी जनावरांचे दर २५ टक्क्यांनी घसरले

पाणीसाठा घटला, चिंता वाढली! मोडकसागर धरणातील साठा प्रथमच ७० टक्क्यांवर; स्विमिंग पूल, मनोरंजन क्लबचे पाणी होणार बंद