मुंबई

मालाडच्या उद्यानाचे 'ते' नाव हटवण्याचे पालकमंत्री लोढांचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीच्या काळात मालाडमधील उद्यानाचे नाव टिपू सुलतान उद्यान असे दिले होते, मात्र सध्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी नाव हटवण्याचे आदेश दिले

प्रतिनिधी

महाविकास आघाडी सत्तेत असताना मालाडमधील क्रीडा संकुल तथा उद्यानाचे नाव टिपू सुलतान ठेवण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते. तत्कालीन पालकमंत्री असलम शेख यांच्या या निर्णयाला भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी याचा आंदोलने करत विरोध केला होता. मात्र, आता सध्याचे मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टिपू सुलतान हे नाव हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट केले की, "अखेर आंदोलन यशस्वी झाले आहे. गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाडमधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव हटवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहेत"

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

ठाणेकरांनो लक्ष द्या; पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागणार

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे