मुंबई

चांदिवलीतील मीनाताई ठाकरे उद्यानाचे नुतनीकरण

प्रतिनिधी

मुंबई : बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने पुढाकार घेतला आहे. पवई चांदिवली येथील मीनाताई ठाकरे उद्यानाचा कायापालट होणार असून या उद्यानात बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो अशा मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ३ कोटी ५० लाख ४१ हजार ७१८ रुपये खर्चणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत १०६८ उद्याने आणि मैदाने आहेत. त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि नुतनीकरणासाठी पालिकेने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांची वाढती संख्या आणि सततच्या वापराने या उद्यान, मैदानाना देखभाल, नवीन सुविधांचा समावेश करण्याची गरज भासते. त्यामुळे प्रत्येक काही वर्षाने टप्प्याटप्प्याने उद्याने, मैदानांची डागडुजी केली जाते. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विविध भागातील उद्यान, मैदानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उद्यानात नवीन फुलझाडे, आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था, पायवाटा तसेच मैदानांत जुनी खेळाची व व्यायामाची साहित्य बदलून अत्याधुनिक नवी साहित्य, आवश्यक तिथे मातीचा थर वाढवणे, सुरक्षा भिंती असे विविध बदल करण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारचे खेळ मुलांना उद्यानात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस