मुंबई

देवनार पशुवधगृहाच्या नुतनीकरणाचे काम रखडण्याची शक्यता,४०२ कोटींच्या निविदा रद्द

देवनार पशुवधगृहाच्या नुतनीकरणाचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरु आहे.

प्रतिनिधी

देवनार पशुवधगृहाच्या नुतनीकरणाच्या निविदेत त्रुटी असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र भाजपचे आरोप फेटाळत अल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्यात आल्या असून लवकरच नवीन निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, देवनार पशुवधगृहाच्या नुतनीकरणासाठी मागवण्यात आलेल्या ४०२ कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या या निर्णयामुळे देवनार पशुवधगृहाचे नुतनीकरण रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवनार पशुवधगृहाच्या नुतनीकरणाचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरु आहे. नुतनीकरण होत असलेल्या देवनार पशुवधगृहात लवकरच अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारून देशातील सर्वात मोठ्या कत्तलखान्याची सुधारणा, मांस साठवण्यासाठी अद्ययावत रेफ्रिजरेटर यंत्रणा, लोडिंग-अनलोडिंग रॅम्प, सौर छत, स्वतंत्र कत्तल युनिट, कचरा विल्हेवाट युनिट आणि रेन वाॅटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे बांधकाम ही कामे प्रस्तावित होती. या कामांसाठी मार्च २०२२ मध्ये जागतिक निविदा मागवण्यात आली होती.

सध्या पशुवधगृहात दररोज ५०० ते ६०० जनावरांची कत्तल होते. मात्र नूतनीकरणानंतर हजारोच्या संख्येने जनावरांची कत्तल करता येईल, इतक्या मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता नसल्याचा दावा भाजपने केला होता. निविदेत विशिष्ट संस्थेला कंत्राट मिळेल, अशा अटी समाविष्ट करण्यात आल्या होत्या, असा आरोप भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना एप्रिलमध्ये पाठवलेल्या पत्रात केला होता. हे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र निविदा प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा