मुंबई

पूर्व उपनगरातील १५ उड्डाणपुलांची दुरुस्ती ; पालिका खर्चणार ४२ कोटी

नवशक्ती Web Desk

मुंबई : सतत वाहनांची ये-जा यामुळे पुलांची वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मुंबई पूर्व उपनगरातील १५ पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका ४२ कोटी रुपये खर्चणार आहे.

सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल २०१९ मध्ये कोसळल्यानंतर मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर मुंबई महापालिकेने मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील पुलांचे ऑडिट केले आहे. ऑडिट रिपोर्टनंतर पुलांची दुरुस्ती डागडुजी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तर ४० वर्षांहून अधिक जुन्या झालेले पूल पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरातील डागडुजी आवश्यक असलेल्या पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहर भागातील १५ पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आता पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

वाढत्या वाहतुकीमुळे पुलांच्या पृष्ठभागाची झीज होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. तसेच सांध्यांमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण होतात. परिणामी वाहनांना हादरे बसण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याबरोबरच पुलाला ठिकठिकाणी कोटिंग व रंगरंगोटीची गरज भासते. विशेषत: अनेकदा पुलाच्या उतारावरील भागावर वाहतुकीचा खूप ताण येऊन खोलगट भाग तयार होतो. त्या ठिकाणी काँक्रिटीकरण, डांबरीकरण किंवा इतर तंत्रज्ञानाने या समस्येवर डागडुजी करणे आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर ही कामे केली जाणार जाणार आहेत. पुलाच्या परिसरातील पदपथ, रस्ता दुभाजक यांच्या दुरुस्तीची कामे आवश्यक वाटल्यास करण्यात येणार आहेत, अशी माहिती पूल विभागामार्फत देण्यात आली आहे.

दर सहा महिन्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट

प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील पुलांची दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ संस्थेकडून पुलाच्या मजबुतीबाबतच्या १७ पातळ्यांवर तपासणी केली जाणार आहेत.

असा होणार खर्च

- एल/कुर्ला, चेंबूर एम पूर्व आणि चेंबूर एम पश्चिम

१५ कोटी ६५ लाख ५९ हजार

- एन/घाटकोपर, एस/विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, टी/मुलुंड

२६ कोटी ५३ लाख ४४ हजार

- एकूण : ४२ कोटी १० लाख १२ हजार

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम