मुंबई

धावत्या रेल्वेवर दगडफेकीच्या, बाटल्या फेकण्याच्या पुन्हा घटना

प्रतिनिधी

कोरोनापूर्व काळात धावत्या लोकलवर दगडफेकीच्या, बाटल्या फेकण्याचा घटना सर्रास घडत होत्या. रेल्वे पोलिसांनी अशा समाजकंटकांविरुद्ध अभियान राबवत या घटना थांबवण्यात यश मिळवले; मात्र नवी मुंबई शहरात काही दिवसापूर्वी असाच एक प्रकार बऱ्याच वर्षानंतर उघडकीस आला आहे. नवी मुंबईत रेल्वे मार्गावर जुईनगर ते नेरूळ दरम्यान दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या. यामध्ये तीन महिला व एक लहान मुलगा जखमी झाले. याप्रकरणी बाटली फेकून मारण्याचा शोध वाशी रेल्वे पोलीस घेत असून ज्या भागात असे प्रकार होतात, त्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त रेल्वे पोलिसांकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काहींना पकडण्यात यश आले असून अद्याप काही समाजकंटकांचा शोध सुरू आहे.

जुईनगर ते नेरूळ दरम्यान शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने रिकामी बाटली लोकलच्या महिला बोगीच्या दिशेने भिरकावली. यात मुंबईत राहणाऱ्या सोनल सावंत यांच्या सह दोन महिला जखमी झाल्या आहेत. तसेच एका लहान मुलालाही काच लागली.

समाजकंटकांच्या शोधासाठी पुन्हा अभियान

दगडफेकीच्या घटना पुन्हा सुरू झाल्याने सुरक्षा यंत्रणांना पुन्हा अभियान राबवून प्रवाशांना विनासंकट प्रवास करण्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?