मुंबई

आठवडाभरात कामावर हजर व्हा, अन्यथा वेतन कपात; निवडणूक ड्युटीवर गेलेल्या पाच हजार कामगारांना पालिकेचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले पाच हजार कामगार अद्याप कामावर रूजू झालेले नाही.‌ पुढील आठवडाभरात कामावर रूजू व्हा, अन्यथा वेतन कपात करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेले पाच हजार कामगार अद्याप कामावर रूजू झालेले नाही.‌ पुढील आठवडाभरात कामावर रूजू व्हा, अन्यथा वेतन कपात करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, पाच हजार कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याने कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. निवडणुकीआधीची तयारी तसेच निवडणुक कालावधीतील काम यासाठी मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील ६० हजार अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर गेले होते. मुंबई महानगरपालिकेचे ९६७४ कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून इलेक्शन ड्युटीवर गेले आहेत. यातील सुमारे निम्मे कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत रूजू झाले आहेत. मात्र निम्मे कर्मचारी अद्याप सेवेत रूजू झाले नसल्याने संबंधित कामे खोळंबत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी तातडीने पालिकेच्या सेवेत हजर व्हावे, असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

६० हजार कर्मचारी सेवेत

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुमारे दहा हजार तर मुख्य मतदान असलेल्या निवडणूक काळात आणि प्रत्यक्ष मतदानादिनी पालिकेचे ६० हजार कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर होते. मात्र मतदान, मतमोजणी झाल्यानंतर त्यातील काही हजर झाले आहेत. मात्र दोन महिन्यांपूर्वी गेलेले अद्याप परत आले नसल्याने पालिका प्रशासनाने आता पगार कापण्याचा इशारा दिला आहे.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती