मुंबई

हृदयविकाराचा धोका पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्येही!

एका हेल्थ केअरकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

प्रतिनिधी

एप्रिल २०२१- मार्च २०२२ या कालावधीत घेतलेल्या आरोग्य चाचण्यांवर आधारित आहेत, ज्यात तपासणी झालेल्या लोकसंख्येपैकी २७ टक्‍के लोकांमध्ये २डी ईको चाचणीत हृदयरोगाची बॉर्डरलाइन स्थिती असल्याचे आणि ५ टक्‍के स्त्रिया व ८ टक्‍के पुरुषांना हृदयाच्या कोरोनरी अँजियोग्राफीमधून दोष आढळून आल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. एका हेल्थ केअरकडून करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

हृदय निकामी होण्याची स्थिती किंवा हृदयाशी संबंधित इतर आजार उद्भवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या धोकादायक घटकांना प्रतिरोध करण्यासाठी प्रतिबंध हाच सर्वात परिणामकारक आणि कार्यक्षम उपाय आहे. एखादी व्यक्ती उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोरोनरी आर्टरी डिजिज यांसारख्या धोकादायक गोष्टी रोखू शकते हे दर्शविणारे भरपूर वैद्यकीय पुरावे उपलब्ध आहेत. यासाठी वजन आणि आहार निरोगी पातळीवर ठेवणे आणि जीवनशैलीशी निगडित काही विशिष्ट सवयींमध्ये सुधारणा करणे गरजेचे ठरते. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत एक किंवा त्याहून अधिक धोकादायक घटक आधीच कार्यरत झाले असतील, तर रक्तदाब आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर तसेच कोरोनरी आर्टरी आजारावर कडक नियंत्रण ठेवल्यास हृदयविकार रोखता येऊ शकतो किंवा त्याचे सुरू होण्याचा काळ लांबवता येतो. अगदी थोडेसे वजन घटवले आणि कार्डिओ- रिस्पायरेटरी अर्थात हृदय व श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायामांचे प्रमाण वाढविले तरीही हृदयाच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. त्याचबरोबर जनुकीय तपासणीसुद्धा सिव्हिडीस चा जनुकीय धोका निश्चित करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावते, आणि त्यानुसार संबंधित व्यक्तीला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करता येतात, असे या इंडस हेल्थ प्लसचे जेएमडी अँड प्रिव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशलिस्ट अमोल नायकवाडी यांनी सांगितले.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब