Mumbai : ...तर महापौरांविरोधात वॉरंट जारी करू! न्यायालयाचा इशारा 
मुंबई

Mumbai : ...तर महापौरांविरोधात वॉरंट जारी करू! न्यायालयाचा इशारा

ऊर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये नोंदवलेल्या खटल्यात सतत अनुपस्थित राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना फटकारले आहे.

Swapnil S

मुंबई : ऊर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना कथित मारहाण केल्याप्रकरणी २०१६ मध्ये नोंदवलेल्या खटल्यात सतत अनुपस्थित राहिल्याबद्दल सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांना फटकारले आहे. न्यायालयाने त्यांच्यावर १ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास त्यांचा जामीन रद्द करून वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला आहे.

बुधवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तावडे यांचे वकील दुर्गा राजपूत यांनी रितू तावडे यांच्या वैयक्तिक उपस्थितीपासून कायमस्वरूपी सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला. तावडे या मुंबईच्या प्रथम नागरिक असून पालिकेच्या विविध कार्यक्रमांमुळे त्यांचा दिवस अतिशय व्यस्त असतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, हा खटला ७ वर्षे जुना आहे या मुद्द्यावर सरकारी वचक इक्बाल सोळकर यांनी या अर्जाला विरोध केला. यापूर्वीच्या सुनावणीतही तावडे यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयाने त्यांच्यावर ३०० रुपयांचा दंड ठोठावला होता आणि त्यांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्या पुन्हा हजर राहिल्या नाहीत, असेही निदर्शनाला आणून देण्यात आले. तथापि, न्यायालयाने तावडे यांचा एका दिवसासाठी वैयक्तिक उपस्थितीपासून सूट देण्याचा अर्ज मान्य केला.

न्यायालयाची ताकीद

न्यायालयाने म्हटले की, २०१७ मध्ये आरोपपत्र (चार्जशीट) दाखल झाले आणि २०१९ मध्ये हे प्रकरण या न्यायालयात वर्ग झाले. आरोपीची सततची अनुपस्थिती खटला लांबवण्याची त्यांची प्रवृत्ती दर्शवते. अद्याप आरोप निश्चित झालेला नाही. मात्र, वकील राजपूत कायमस्वरूपी सूट मिळण्याची विनंती करत आहेत. आरोपीच्या सामाजिक स्थितीचा विचार करून अजामीनपात्र वॉरंट जारी केले जात नाही आणि खटल्याची सुनावणी जलद गतीने चालवण्यासाठी सहकार्य केले जाईल, ही अपेक्षा आहे.'

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

'ते' समाजकंटक नव्हेत, आंदोलन हा त्यांचा हक्क; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून हायकोर्टाची राज्य सरकारला चपराक

... तर SIR थांबवणे शक्य; माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे स्पष्ट मत

व्याजदर वाढीच्या झळा; रेपो दरात पाव टक्के वाढ, भविष्यात अधिक दरवाढीचे संकेत

मुख्यमंत्र्यांनी घेतली शहांची भेट; दुष्काळाबाबत भरीव मदत करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन