NEET फेरपरीक्षेचा पेपर गुजरातमध्ये फुटला? रोहित पवारांचा आरोप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

NEET फेरपरीक्षेचा पेपर गुजरातमध्ये फुटला? रोहित पवारांचा आरोप

'नीट’ फेरपरीक्षेचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला होता असा दावा काही बातम्यांच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे.

Swapnil S

मुंबई : 'नीट’ फेरपरीक्षेचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला होता असा दावा काही बातम्यांच्या आधारे आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. ही गोष्ट सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तपास यंत्रणांनी या संदर्भात त्वरित खुलासा करावा आणि यामागील रॅकेट उघडकीस आणावे, अशी विनंती पवारांनी केली आहे. तसेच त्यांनी पेपरफुटी संदर्भात पुढे आलेले स्क्रीनशॉट, मेल, संभाषण या सगळ्याची एक लिंक देखील यासोबत ट्विट केली आहे.

राज्यात २ हजार शाळा बंद- राऊत

दरम्यान, एकीकडे नवीन शाळांना मंजुरी दिली जात असताना दुसरीकडे राज्यातील तब्बल २ हजार शाळा बंद पडल्याची खंत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांना लावल्या जाणाऱ्या शालाबाह्य कामांवरही (सर्व्हेक्षण आणि इतर कामे) त्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

'बोगस डिग्री स्कॅम'; राऊतांचा गौप्यस्फोट

राज्यात शिक्षणाचा बाजार मांडला असल्याचा आरोप करत राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ‘महाराष्ट्रात सध्या बोगस डिग्री स्कॅम सुरू आहे. वाटल्या जाणाऱ्या १० पैकी २ डिग्री या बोगस असतात. माझ्याकडे या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि पुरावेही आहेत, असा मोठा दावा त्यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video