प्रातिनिधिक फोटो
मुंबई

ऑनलाईन फसवणुकीचे ४ कोटी वाचविण्यात यश

ऑनलाईन फसवणुकीची ४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम सायबर सेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले आहे.

Swapnil S

मुंबई : ऑनलाईन फसवणुकीची ४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम सायबर सेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले आहे. ही रक्कम कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. या कामगिरीबाबत सायबर सेल पोलिसांचे कौतुक होत आहे.

यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची कांदिवली परिसरात एका खासगी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून सीम स्वॅपच्या माध्यमातून अज्ञात सायबर ठगांनी प्रवेश करून साडेसात कोटींची रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्सफर केली होती. याबाबत बँकेतून मेल प्राप्त होताच त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी लगेचच सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर केलेल्या कारवाईनंतर तक्रारदाराच्या बँक खात्यात ४.६५ कोटीची रक्कम पुन्हा ट्रान्सफर करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता