मुंबई

दादर, कुर्ला, सीएसएमटी स्थानकांवर हल्ला होणार असल्याचा फोनबाबत अफवाच

प्रतिनिधी

६ डिसेंबर रोजी देशभरात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त रेल्वे स्थानकात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मात्र याच दिवशी मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर एक व्यक्ती हल्ला करणार असल्याबाबत माहिती देणारा संदेश नवी मुंबईतील ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला प्राप्त झाला होता. पण सुदैवाने त्यात तथ्य आढळले नाही.

नवी मुंबईतील ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवरून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवार ६ डिसेंबर रोजी दूरध्वनी आला. औरंगाबाद गंगाखेड येथून दूरध्वनी करणाऱ्या या व्यक्तीने गुजरात पोरबंदर येथून येणारी व्यक्ती मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर रेल्वे स्थानकांवर हल्ला करणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई हेल्पलाईनकडून याबाबतची माहिती तात्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंचा जनसमुदाय दादर येथील चैत्यभूमीवर उसळला असताना अशाप्रकारची धक्कादायक माहिती मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले. याबाबत चौकशी, तपासणी सुरु करण्यात आली. या माहितीचा खोल तपास केला असता तपासणीत त्यात कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप