Photo : X
मुंबई

रशियन अंतराळवीर डेनिस मॅटवीव यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद; अंतराळ संशोधनातील करिअरच्या विविध संधींचे उलगडले रहस्य

रशियन अंतराळवीर डेनिस मॅटवीव यांनी आज मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. अंतराळ संशोधन, प्रशिक्षण, विविध संधींचे दालन, तांत्रिक तयारी आणि मानवी क्षमतेच्या मर्यादा यांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Swapnil S

मुंबई : रशियन अंतराळवीर डेनिस मॅटवीव यांनी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. अंतराळ संशोधन, प्रशिक्षण, विविध संधींचे दालन, तांत्रिक तयारी आणि मानवी क्षमतेच्या मर्यादा यांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल स्टूडेंट कोलॅबोरेशन अँड लिंकेजेस आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी हेड डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल एक्टिव्हीटिज कॉस्मॉनॉट ट्रेनिंग सेंटर रशियाचे इगोर कोरेशेव, रशियन हाऊस नवी दिल्लीचे व्हिक्टर गोरेलिख, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक उपस्थित होते.

मॅटवीव यांनी घेतलेले प्रशिक्षण, १९४ दिवसाहून अधिकचे फ्लाईट ड्युरेशन, चार स्पेस वॉक यासह संशोधन कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी अंतराळ मोहिमेतील दैनंदिन जीवन, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, तसेच अंतराळातील आव्हाने आणि शिस्तीचे महत्त्व याबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना मॅटवीव यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी विज्ञान, अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान आणि गणितातील भक्कम पायाभूत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील बदल यावरही विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी अशा आंतरराष्ट्रीय संवादांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील जागतिक दृष्टी मिळत असून अशा प्रेरणादायी संवादातून अंतराळ क्षेत्राबद्दलची उत्सुकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेला हा संवाद सत्र आंतरराष्ट्रीय सहकार्य, संशोधन आणि नवोन्मेषाचा एक उल्लेखनीय नमुना ठरला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके