मुंबई

सदानंद कदम जामीनासाठी हायकोर्टात; साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरण

साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला

नवशक्ती Web Desk

मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांना सत्र न्यायालयाने मोठा झटका देत जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. कदम यांनी जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेची न्यायामूर्ती एम. एस. कर्णिक यांनी दखल घेत सुनावणी २९ नोव्हेंबरला निश्चित करत ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

साई रिसॉर्ट बांधकामाशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने सदानंद कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात कदम यांच्या वतीने अ‍ॅड. प्रेरणा गांधी यांनी आव्हान देताना जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. अमित देसाई यांनी विविध मुद्दे न्यायालयाच्या निर्दशनास आणून देत तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत ईडीला नोटीस बजावत २९ नोव्हेंबरपर्यंत भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर