मुंबई

सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री उद्यान, मैदान, शौचालयात वापर ;पाच मलजल प्रक्रिया केंद्रातील २ कोटी लिटर पाण्याची विक्री

गेल्या काही वर्षांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.

Swapnil S

मुंबई : सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या कुलाबा, बाणगंगा, चारकोप, माहूल, चेंबूर या पाच मलजल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. पाच मजलज प्रक्रिया केंद्रातील २ कोटी १३ लाख लिटर पाण्याची विक्री करण्यात येणार आहे. दर निश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच पाणीगळती, पाणीचोरी यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता बघता, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरात आणता यावे, यासाठी पाच ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र सुरू केली आहेत. याठिकाणी दररोज २ कोटींहून अधिक लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले पाणी उद्यान, मैदाने शौचालयात वापराता येणार आहे. तसेच मुंबईतील मोठ्या कंपन्यांतही पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज असते. त्यामुळे पाच मलजल प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी विक्री करण्यात येणार आहे. पाण्याची विक्री करण्यासाठी दर निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दर निश्चितीसाठी गुरुवारी निविदा मागवल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री

कुलाबा - १ कोटी लिटर

१० लाख लिटर

४५ लाख लिटर

४३ लाख लिटर

१५ लाख लिटर

२ कोटी १३ लाख लिटर पाणी

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत