मुंबई

सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण: बिश्नोई टोळीतील सदस्याला जामीन नाही

गेल्या वर्षी अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अटक केलेल्या कथित लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

Swapnil S

मुंबई : गेल्या वर्षी अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अटक केलेल्या कथित लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्याचा जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी मोहम्मद रफिक सरदार चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला. सविस्तर आदेश अद्याप उपलब्ध झालेला नाही.

१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी वांद्रे पश्चिम येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर विक्की गुप्ता आणि सागर पाल या दुचाकीस्वारांनी गोळीबाराची घटना घडवून आणली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौधरी यांनी गोळीबाराच्या दोन दिवस आधी गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती, त्या परिसराचा व्हिडिओ शूट केला होता आणि तो या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी अनमोल बिश्नोईला पाठवला होता.

चौधरी, गुप्ता आणि पाल यांच्यासह सोनुकुमार बिश्नोई, मोहम्मद रफिक चौधरी आणि हरपाल सिंग हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण