PTI
मुंबई

शाळा, महाविद्यालय परिसर तंबाखूजन्य पदार्थमुक्त; विक्री करणाऱ्यांविरोधात पालिकेची कारवाई

आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून मुंबई तंबाखूजन्य पदार्थमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. मात्र आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून मुंबई तंबाखूजन्य पदार्थमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या एफ-उत्तर विभागाच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. यावेळी चार दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. तर त्यांच्याकडून एकूण ९३ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा-२००३ च्या कलम-४ नुसार, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरात विडी, सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री करण्यास तसेच बाळगण्यास प्रतिबंध आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कार्यक्षेत्रातील शैक्षणिक संस्था परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

शैक्षणिक संस्थांलगतचा परिसर तंबाखूजन्य पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या देखरेखीखाली एफ-उत्तर विभागाच्या वतीने धडक मोहीम मंगळवारी हाती घेण्यात आली.

कारवाईचा बडगा उगारला

कोकरी आगार येथील म्हाडा कॉलनी परिसरातील प्रियदर्शनी शाळा आणि एस. के. रॉयल शाळा, शीव परिसरातील साधना शाळा, माटुंगा परिसरातील रुईया महाविद्यालय आणि पोतदार महाविद्यालय, मंचेरजी जोशी उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसरातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच माहेश्वरी उद्यान परिसर या ठिकाणी कारवाई करत ९५ किलो ५०० ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. त्यामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा आदींचा समावेश आहे. तसेच याठिकाणी असलेले तंबाखूचे एक दुकान आणि तीन बाकडे निष्कासित करण्यात आले. यावेळी पोलिसांनी देखील कारवाईसाठी सहकार्य पुरवले.

मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडू नका! पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती