संग्रहित छायाचित्र 
मुंबई

यंदाच्या वर्षात विद्यार्थी जुन्याच गणवेशात; १५ जूनपर्यंत शालेय वस्तू मिळतील; पालिकेच्या शिक्षण विभागाचा दावा

शाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असून, बूट, वाॅटर बाॅटल, दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश आदी २७ शालेय वस्तू यंदाच्या शैक्षणिक वर्षांत उशिराच मिळणार...

Swapnil S

मुंबई : शाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक असून, बूट, वाॅटर बाॅटल, दप्तर, वह्या, पुस्तके, गणवेश आदी २७ शालेय वस्तू यंदाच्या शैक्षणिक वर्षांत उशिराच मिळणार आहे. २७ शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी नुकतीच वर्क ऑर्डर दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान, २७ शालेय वस्तूंचा पुरवठा करण्याची वर्क ऑर्डर दिली असून, १५ जूनपर्यंत सगळ्या वस्तूंचा पुरवठा होईल, असा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाने केला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळा आता पुढील आठवड्यात सुरू होणार असून, अद्यापही विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदीची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. पालिकेच्या वतीने सन २०२४ ते सन २०२५ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी या शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत असून, या खरेदीसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला कार्यादेश देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ऑगस्टपर्यंत या वस्तू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार 'ये रे माझ्या मागल्या' म्हणीप्रमाणे हाकला जातोय.

प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर वस्तूंचे वाटप

गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन २००७ पासून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे; मात्र एक ते दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आलेले आहे.

विद्यार्थ्यांची संख्या

इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता २ री : २,५१,५१६

इयत्ता ३ री ते ७ वी : ३,८२,३८६

इयत्ता ८ वी ते १० वी : १,६६,६३८

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल