मुंबई

उद्या मुंबई, ठाणे पालघर, रायगड येथील शाळा बंद राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत शाळांना सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले

नवशक्ती Web Desk

मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत शाळांना सुट्ट्या दिल्याचे जाहीर केले आहे.
उद्या मुंबई, ठाणे पालघर, रायगड येथील शाळा बंद राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सरकारी यंत्रणा सतर्क आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव