मुंबई

Mumbai International Airport : आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊनमुळे गर्दी

प्रवाशांची तपासणी, बॅगेज काउंटर, चेक-इन, बोर्डिंग पास देणे हे सर्व थांबले आहे. या संदर्भात, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफने...

प्रतिनिधी

देशातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गेल्या 20 मिनिटांपासून चेक इन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियोजित उड्डाणे बुक असताना चेक इनसाठी विमानतळावर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. सर्व्हर डाऊनमुळे ही अडचण झाल्याचे बोलले जात आहे. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील असून लवकरच सेवा पूर्ववत होईल, असे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्यामुळे प्रवाशांच्या डेटाचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. प्रवाशांची तपासणी, बॅगेज काउंटर, चेक-इन, बोर्डिंग पास देणे हे सर्व थांबले आहे. या संदर्भात, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार, सर्व्हर डाऊनमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेहमीपेक्षा थोडी जास्त गर्दी आहे. अनेक ट्विटर युजर्सनी गर्दीचे फोटो शेअर केले आहेत. 

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

ओबीसी महासंघाचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती; पूर आणि भूस्खलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

मुंबई, उपनगरात ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल; ५ सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी आता ८ सप्टेंबरला

१३ सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर? कुकी समूहासोबत शांतता करार