मुंबई

मेधा सोमय्यांकडून मानहानीचा दावा: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाचा दिलासा

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या अन्नुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी २०२५ रोजी निश्चित.

Swapnil S

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या अन्नुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. गेल्या महिन्यात दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेला १५ दिवसांचा साधा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी स्थगिती देताना खा. संजय राऊत यांना ५० हजार रु.च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मीरा-भाईंदर महापालिकेतील शौचालये बांधण्याच्या कामातील ३ कोटी ९० लाख रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त एका वृत्तपत्राने एप्रिल २०२२ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताबरोबरच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी विधाने केल्याने बदनामी झाली, असा दावा मेधा यांनी केला होता.

या दाव्याच्या खटल्यात न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी खासदार राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांचा साधा तुरूंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावताना आपल्याच निर्णयाला स्थगिती देत अपील दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती.

खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी २०२५ रोजी

खासदार राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य एडीट करून सादर करण्यात आले. जनहितासाठी केलेले भाष्य बदनामी ठरू शकत नाही, असा युक्तिवाद खासदार संजय राऊत यांच्यावतीने अॅड. मनोज पिंगळे केला. याला सोमय्या यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना दिलासा देताना दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देताना राऊत यांना ५० हजारांचा जामीन मंजूर केला. तसेच खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी २०२५ रोजी निश्चित केली.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी