मुंबई

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

नेहा जाधव - तांबे

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान, पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट तसेच नेटफ्लिक्स विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

काय आहे आरोप?

१८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' या वेब सिरिजचे दिग्दर्शन आर्यन खानने केले आहे. या सीरिजमध्ये समीर वानखेडे यांच्या सारखे दिसणारे पात्र दाखवले गेले असून, त्याद्वारे त्यांच्या प्रतिमेची जाणूनबुजून बदनामी करण्यात आल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, सीरिजमध्ये ड्रग्जविरोधी अंमलबजावणी संस्थांना चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. एक 'सत्यमेव जयते' नामक पात्र दाखवले आहे. जे नंतर अश्लील हावभाव करते. हा प्रकार राष्ट्रीय घोषणेचा अपमान असून, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ अंतर्गत दंडनीय आहे. काही दृश्ये माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या कलमांचे उल्लंघन करतात, असा आरोप देखील करण्यात आला आहे.

मानहानीची रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला

या मानहानीच्या याचिकेत समीर वानखेडे यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण रक्कम त्यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, जेणेकरून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ती उपयोगी पडेल.

आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्याशी संबंधित प्रकरण आधीच मुंबई उच्च न्यायालय आणि NDPS विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर नव्या मानहानीच्या खटल्यामुळे शाहरुख खान पुन्हा अडचणीत सापडला आहे.

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांचा तपास सुरू

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video