मुंबई

शरद पवार पुन्हा इस्पितळात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांना सौम्य निर्जलीकरणाच्या (डिहायड्रेशन) तक्रारीमुळे शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार यांना सौम्य निर्जलीकरणाच्या (डिहायड्रेशन) तक्रारीमुळे शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत.

पवार यांना यापूर्वी बुधवारी पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुढील निरीक्षणासाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर वरिष्ठ फिजिशियन व इंटेन्सिविस्ट डॉ. प्रतीत सामदानी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पवार यांना तीन ते चार दिवस रुग्णालयात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. पवार रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच विविध राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. भाजपच्या नेत्यांनीही भेट देऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम

व्यापारासाठी नौकानयनाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी