इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोरा यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

शीना बोरा हत्याकांड खटल्याला कलाटणी; पेण पोलिसांना सापडलेले हाडांचे अवशेष गायब

Swapnil S

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आत नव्याने कलाटणी मिळाली आहे. १२ वर्षांपूर्वी पेण पोलिसांना सापडलेले हाडांचे अवशेष गायब झाल्याचे उघड झाले आहे. हे अवशेष शोधूनही सापडले नाहीत, अशी स्पष्ट कबुलीच सीबीआयने गुरुवारी सत्र न्यायालयात दिली. दरम्यान, शीना बोरा हत्याकांडात शीनाच्या हाडांचे अवशेष हा महत्वाचा पुरावा मानला जात होता.

शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. २०१२ मध्ये शीनाचा मृतदेह जाळण्यात आलेल्या ठिकाणी पेण पोलिसांना अवशेष सापडले होते. त्या अवशेषांची पहिली चाचणी जे. जे. रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. झेबा खान यांनी केली होती. ते अवशेष मानवी हाडांचे असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

मागील सुनावणीच्या वेळी सीबीआय वकील ॲड. सी. जे. नांदोडे यांनी पेण पोलिसांना १२ वर्षांपूर्वी सापडलेल्या अवशेषांची ओळख पटवण्याच्या हेतूने ते अवशेष खान यांना दाखवण्याची मागणी केली होती.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था