मुंबई

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडियोप्रकरणी दोघांना अटक

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंसोबत प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा आक्षेपार्ह व्हिडियो मॉर्फकरून व्हायरल केला असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. दहिसर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. या व्हिडीओवर स्वतः शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत की, "राजकारणातील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करायचे हेच 'उद्ध्वस्त' गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्रीबाबत असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "एखादा पुरुष राजकारणात स्त्रिला कसे वागवतो? याचे मला अनुभव आले आहेत. हे असले व्हिडियो व्हायरल करणारे कोण आहेत? हे सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचे नाते असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कोणाचे डोके आहे? याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे." अशी टीका त्यांनी केली.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश